मी परेश आचरेकर……,

आयूष्यातं खूप काही करावं, त्यासाठी वाटेल तेवढं धडपडाव,हा एकचं ध्यासं घेवून जगतानां, त्यात
कितीही अडचणी आल्या तरी मागे परतायचं नाही, हे मनोमन पक्कं केलं आवडं नसताना देखीलं एम. सी. सी. कॉलेजमध्ये वाणिज्यं शाखेत प्रवेश घेतलां.सुरूवातीला इंग्रजीचा थोडासा त्रासं झालां, परंतू कष्टाने, कशीबशी अकरावी झाल्यावरं मात्र बारावीला अभ्यासावरं जोर दिला. कमलाकर क्लासेसच्यां, कमलाकर सरांनी स्फुर्ती दिली व त्यां स्फुर्तीनेचं बारावीचे युद्धं त्र्याहत्तरटक्क्यांवर जिंकले.वाणिज्यं शाखेतचं पदवी घेतल्यावरं, पुढे काय करावयाचं, या प्रश्नातं गूंतलेलो असतानां, स्पर्धा परीक्षांचे फॅड मनातं व मलां योग्यं दिशां मिळाली. इतिहास, राज्यशास्त्रं, अर्थशास्त्र, मराठी वाङमय, प्रशासन या आवडत्या विषयांचा परीसस्पर्श झालां.त्याचवेळी कायदां या माझ्या आवडत्यां विषयातं पदार्पण झालं. ठाण्यातीलं व्ही. पी. एम. टि.एम. सी. कॉलेजमध्ये प्रवेशं घेतलां व दोहोंचा अभ्यास करु लागलो. सुरूवातीलां मराठी भाषा की इंग्रजी भाषा याबद्दल संभ्रम होता, परंतू कायदे ब्रिटिशबेस आहेत हे कळल्यावरं इंग्रजी भाषा स्विकारली.

ऐरोलीत स्थायिकं झाल्यावरं, नव्यां ओळखी झाल्यां, नवे मित्रं मिळाले. मला माझ्यां आवडीची,मला हवी होती, तशीचं‘साई पॅराडाइज सोसायटी’ लाभली. चांगली संगत मिळाली, आमच्या सोसायटीत “श्री साई बाबांचे” मंदिर आहे, तेथे भजन करावयास सोसायटीतील मंडळी बसू लागली व तबला वाजवण्याची
आयती संधी लाभली।


आमच्या सोसायटीत सर्व उत्सवं साजरे होऊ लागले, गणपती, स्वातंत्र्यदिन, होळी, रंगपंचमी, तुळशीविवाह, थर्टीफर्स्ट असे सर्वचं. या सर्वांमूळे मला स्फुर्ती मिळाली.

ऐरोलीतचं ‘महाराष्ट्रं सेवा संघा’ची लायब्ररी लाभली, विविध कादंबर्या व पुस्तके वाचली, अजून बहुसंख्य वाचावयाची आहेत.मध्ये ‘पॅनकार्ड क्लब’ची एजन्सी देखीलं घेतली, केवळं एका मित्राच्या आग्रहाखातीरं.

राजकारणाची आवडं होतीच व तशी एका चांगल्या पदाची संधी देखीलं चालून आली, परंतू शिक्षणामूळे व नवी मुंबइच्या एकंदर राजकिय परीस्थितीचां विचार करता ‘दुरून डोंगर साजरे’हाच विचारं मनात आला व
‘पुढे पाहू’ असे राजकिय उत्तरं देवून, काढता पाय घेतला.

आयुष्याची असंख्य स्वप्ने पाहताना ती पूर्ण व्हावीत म्हणून अजून खुप काही करावयाचे आहे आणि ते “ध्येय्यं” गाठण्यासाठी पुष्कळं धडपडावे, हाच “आशावाद” आहे. हेच आहे, थोडक्यातं "माझ्याबद्दलं", माझ्या आयूष्याच्या प्रवासाबद्दल ...