“ओझर एक प्रेक्षणीयं स्थळ”
सायंकाळची वेळ होती, सर्व घरची मंडळी गप्पाष्टकांमध्ये रंगली होती. चहाच्या भुर्रक्यांचे मनमुराद आस्वाद लुटतं होती. मी देखीलं त्यांतलाच एक भाग झालो होतो. अचानक मनांत एक लहर शिरली! आत्तां आमचे लहरी मन, शांत का राहणार! मग काय! मी माझ्यां सख्यां बंधुस व चुलत बंधुस हाक मारली! इकडेतीकडे गावात भिरभिरणारे दोघेहि क्षणातं हजरं! मी लागलीच त्या अशांत लहरीस वाट मोकळी करुन दिली, मनावरचां ताण कमी झालां खरां, पणं उत्तराचे काय? दोघांचाही होकार हवा होतां, त्याशिवाय काय मन थारणार होतं? मी दोघांच्याही चेहर्‍यावरील हावभाव पाहू लागलो, शेवटी उत्तर काय असणारं! होकारचं! पर्यटनस्थळी भेटं देण्यासं कोण शहाणां नाही म्हणेलं?
लहरीला योग्य प्रतिसाद मिळाल्यावरं मनावरील अखेरचा ताणं निवळला आणि लागलो सर्वजण तय्यारीला. आत्तां लहर कोणती असणारं! एकच असणारं! मालवणनजिक “ओझर” येथील “श्री ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीस्थळी” भेटं देऊन यावी!
जशी सर्वं तय्यारं झाले, मग काय राव! नुसते ओझरं डोळ्यासमोर नाचू लागले. जवळजवळं चार-पाच वर्षांनी भेटं देणार होतो, म्हणून अधिकचं उत्साहं होतां. आम्ही थोरामोठ्यांची परवानगी घेतली आणि लागलो ओझरच्या वाटेला. वाट भली मोठी नव्हती, त्यामुळे पायीच जाण्याचे ठरविले. वाटेत दक्षिण कोकणचा हिरवागारं निसर्ग पाहत, चेष्टां-मस्करी करीत, विविधं छायाचित्रे टिपंत, हसत-खिदळत वाट कापूं लागलो. रेवंडीची घाटी संपली, ओहोळावरील पुल ओलांडले, हडकर दुकान मागे गेले, ओझरचे मळे दिसूं लागले आणि पाहतो तर काय! तो अनमोल क्षणं नजिक आला. मनांत प्रचंड खळबळ निर्माण झाली. मनानं चंचलतेची सीमा पार केली. इतका वेळं थट्टां-मस्करी करीत, निसर्गाचा आनंद लुटणारे, हळूवार संथ गतीनं चालणारे आम्ही अचानक पावलांस वाहनाचे इंजिन बसवावे, तसे चालु लागलो. चाललो कसले, पळतच सुटलो म्हणा नां! पाहतो तरं काय? समोरच ओझरं!
आम्ही ओझरच्या द्वारावरंच होतो. द्वारावरच "श्री ब्रह्मानंद स्वामीं यांची समाधी" असा फलक होता. आंत शिरल्यावर पायर्‍यांसमान उतरन होती. समोरच एक लहानसां धबधबा कोसळत होतां, तो पाहून तर मनं उचंबळुनच उठले. माझे दोन्ही बंधु तर आनंदानं उड्यांच मारु लागले. उजवीकडं वळल्यावर पुन्हा उतरन होती. समोरच एक तलाव होतां. बाजुस थोडे वर चालुन गेल्यावरं एक लहानशी गुहा होती, गुहेच्या मुखावरच “श्री ब्रह्मानंद स्वामीं” यांची समाधी होती. त्या गुहेस लागूनच एक मोठी गुहा होती. सभोवताली वृक्षांची दाटी होती. खोल खिंडीत आम्ही होतो.
धबधब्याचा आवाज, तलावांतील माश्यांची चळवळं, गुहेची आर्त गुप्ततां, आसपासच्या वृक्षांच्या पर्णांचा ध्वनी, दगडांतील झर्‍यांमधून झिरपणारे पाणी, शुद्ध वातावरणं हे सर्व आंम्हास प्रसन्न करीत होते. ओझरच्या गुहेबाबत एक घटना प्रसिद्धं आहे. आसपासच्या रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, एकदां स्वामी ब्रह्मानंद त्या गुहेंतून आंत गेले असतां थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावरं उमटले. या घटनेवरून पुरातत्वं खात्याने संशोधन देखील केले, परंतू गुहा अर्ध्यावरच बंद झालेली आढळली. हिच असावी त्या गुहेबाबतची गुप्ततां. काही जणांच्या मते हे ठिकाण पांडवकालीन आहे, तर काही जणांच्या मते हे ठिकाण शिवकालीन आहे.
मी त्या गुहेकडं पाहिलं. काही छायाचित्रे काढली. डोंगरांतून झिरपणारं पाणी पाहिलं. थोडे खाली उतरलो. तलावांतील माश्यांची चळवळ पाहिली.पुन्हां थोडं पायर्‍यां चढत वर गेलो. बाजूसच एक देऊळ होते. तेथे दर्शन घेतले व पुन्हां पायर्‍यांकडे वळलो. अर्ध्यावर पुन्हा धबधबा दिसू लागलां. मोह अनावर झालां होतां. खाली उतरुन धबधब्यानजिक गेलो. उंच कड्यावरून उड्या मारीत येणारं शुभ्रं सफेद दुधाळ पाणी मन मोहुन घेत होतं! थोडावेळ एकटक मी त्या धबधब्याकडं पाहत राहिलो. धबधब्याचा मनमुराद आनंद लुटलां. फार उशीर झाला होतां. पुन्हा मालवण येथे जावयाचं होतं. तसेच पुन्हा वर निघालो. शिवरायांच्या मावळ्यांची आठवण झाली. पुन्हा तोच फलक परंतु विरुद्ध दिशां, जाताना जीव वर खाली होत होता. परंतू मोहाला देखील मर्यादा आहेत. मी पुन्हा त्या फलकाकडे पाहिले. मी का पाहिले असेल? हे कोणताही पर्यटनवेडा व्यक्ति जाणेलचं!
ओझर एक प्रेक्षणीयं स्थळ आहे. गुहां, देऊळ, समाधी, तलावं व धबधबा असे सर्वचं एका ठिकाणी सापडल्यासं किती आनंद होतो, हे केवळं भेट देण्यार्‍यासंच कळेलं! म्हणुनच या स्थळास आयुष्या एकदातरी भेट द्यावीच!

स्थळ : ओझर-"श्री ब्रह्मानंद स्वामींची समाधी" “आचरे रोडवर”
जवळचे रेल्वे स्थानक : कुडाळ
जवळचे बस स्थानक : मालवण
जवळचे शहर: मालवण
पाहण्यासारखे: समाधीस्थळं, तलाव, गुहां, धबधबा

परेश प्र. आचरेकर
acharekar_pareshh@rediffmail.com