माझं गावं,
निळाशार समुद्रकिनारी वसलेलं माझं गावं. मालवण येथून सुमारे तीन किलोमीटरचं अंतर. आमचं घर अगदि किनार्याला भिङलेलं त्यामूळं लाटांच्या गर्जणार्या आवाजानं शांतता दुरापास्तचं. आमचं गावचं घरं म्हणजे नव्यां जून्याचां संगम.लहान ङोंगरातून लहानशी लालबुंद वाट जाते, त्या वाटेच्यां आजूबाजूला हिरवीगार झाङं आहेत. वाट उतरतानां जवळचं एक भलं मोठं वटंवृक्षं आहे, त्या वृक्षावरं नेहमीचं मर्कटांची गर्दी असते. पुढं सरळं चालंत गेल्यावरं एक विहिंर आहे. विहिरीलां लागुनचं एक ओहोळं आहे, आणि ओहोळं ओलांडल्यावर समोरचं भलं मोठं घरं दिसेलं, ते आहे आमचं घर. आमचं अंगण मोठं आहे. घरासमोरं तुळशीवृंदावन आहे. आमच्या परङ्यात तुंम्हाला विविध वृक्ष आढळतील, आम्र, काजू, कल्पवृक्ष, जाम, जांभुळ, रतांबा, करवंद, तोरणं, बदाम असे एक नाही तर असंख्य वृक्ष. त्यातंल्यात्यातं मागील बाजूसं असलेलं मोठालं काजूचं झाङ आमचं आवङतं. त्यावरं मनसोक्तं खेळायचं, झोकायचं हे आमचे छंद. खाली गेल्यावरं सागराचं दर्शन. आमचं आवडतं ठिकाण. पाण्यात तासनतास खेळायचं, वाळूत लोळायचं ह्याचाच आनंद. मुंबईतील धकाधकिच्या जिवनातूनं गावी जाणं आणि गेल्यावरं तिथंच रहावेसं वाटनं सहाजिकचं. कारणं आमचं गाव आमच्यासाठी स्वर्गचं. खरोखरंचं दक्षिण कोकणातीलं परशूराम भुमीतीलं आमचं गावं म्हणजे आम्हाला ईश्वरानंदिलेलं वरदानचं.........