विनवणी!
"पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका" असे लिहिण्याची वेळ कुसुमाग्रजांवर का यावी? याचा कोणी विचार केला आहे का? आपण ज्या देशात राहतो, त्या स्वातंत्र्यदेवतेनेचं आंम्हाला विनंती करावी!अशी वेळ आंम्हा भारतीयांवर का यावी? आहे का उत्तर कुणाकडे?

देशाच्यां कानाकोपर्यांत चाललेलां भ्रष्टाचारं, अनैतिकतेने घातलेलं थैमानं, गरीबांवर होणारां अनाचारं, गुन्हेगारीचं वाढलेलं प्रमाणं,न्यायदेवतेचां थाटलेलां बाजारं, खुलेआम पायदळी तूडविले जाणारे कायदे, हिसांचारानं पेटलेलं रानं, धर्मावर केले जाणारे राजकारण,निसर्गावर होणारे सततचे अत्याचारं, संस्कृतीचे होणारे खच्चीकरण इ . असंख्य प्रश्नांनी स्वातंत्र्यदेवीलां पछाडलेलं असतानां, तीला आपण अभिवादन करुचं कसे शकतो. पूर्वी जेव्हां आपल्यां देशातं परकियं इंग्रजांचं राज्यं होतं, त्यावेळी त्यांनी जे काहि केलं, त्याहून वेगळं अस्सं काय केलं आपण? लोकशाहिचा अक्षरशः चूथडा झाला,त्या मागं आपणचं कारणीभूत नाहि का? कारण निवडून देणारे महाभाग आपणच असतो. इंग्रजांनी वापरलेली 'फोडा आणि राज्यं करां' हिच निती, आजकालचे, आपलेच राज्यकर्ते वापरतं आहेत व लोकांना मूर्ख बनवितं आहेत व आपण मूर्ख बनत आहोत, हे खर नाहि का? भ्रष्टाचारावरं तोंड सोडून बोलणारे आपणं, स्वतः किती स्वच्छ असतो?
आपण स्वतःच स्वतःचे गुन्हेगार असतानां, इकडे तिकडे का पहावे . बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये,एखादा ज्येष्ठ नागरिक उभा असताना, आपण उठून त्यांना जागा देतो का? गाड्या चालवताना वेग व सिग्नलचे कितीसे भानं ठेवतो आपण? रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करताना इतरांचा विचार करतो? बेफिकीर होऊन, हवे तसे पैसे उधळताना, भूकेलेल्या गरीबांचा विचार करतो? मंदिरात वशीलेबाजी करताना रांगा लावणार्र्यांचा विचार करतो? मोठमोठ्यानं स्पिकर लावताना इतरांना होणार्र्या त्रासाचा विचार करतो? लाच देताना होणार्र्या भ्रष्टाचाराचा विचार करतो?

आपणच वागताना जर योग्यप्रकारे वागलो नाही तर दोष कोणाला द्यायचे, म्हणून आत्मपरिक्षण करण्याची हिच वेळ आहे .स्वातंत्र्यदेवतेची हि विणवणी आपण व्यर्थ न घालवतां, चला आपण स्वतःला घडवूयां . देशाची प्रगती करुया