सुंदर तारांगण

नभी या सजले, रात्रीस पहा, किती सुंदर तारांगण

नेत्र पाहूनी, दिपूनी जाती, ग्रह तार्‍यांचे प्रांगण

शुक्र तेजस्वी नभाची
वाढवे विलासी शोभा
मंगळ गगनी विराजूनी
गाजवे क्रोधाचा गाभा

शनी भोवती कडे सांगे
मी रक्षण करण्यासी थोरं
चंद्र जणू दुग्ध प्राशूनी
भासे पृथ्वीचे लहानगे पोरं

गुरू सतर्क तत्परं आहे
समतोलं राखण्या तत्वांचा
बुध हा लहान असुनी
सांगे मी आहे तिक्ष्ण बुद्धीचा

नक्षत्रे तेजस्वी तारकांची ह्या
सांगती दिशाभानं लोकांना
हर्षलं शेवटी लपूनी
सांगे गुप्तं गोष्टी सर्वांना

धुमकेतूही दौडतं आहे
झाला क्रोधानं व्याकुळं
कधी कधी तरं मध्येचं
असतो उल्कांचा धुमाकुळं

ध्रुवं उत्तरे विराजूनी सांगे
भक्तीचे तत्वज्ञानं
तारे सर्वची नभी मंडपी
जणू सभाचं भरली छानं

हे सर्व पाहूनी, इतुका काही, मी गेलो हो दंगुनं
नभी या सजले, रात्रीस पहा, किती सुंदर तारांगण

- प. प्र. आचरेकर